तुम्ही कधी असे ऐकले आहे का? एखाद्या गावात पाऊसच पडत नाही. तरीही तेथे लोक राहत आहेत. नसेल ऐकले तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावाबद्दल माहिती सांगणार आहोत…
येमेनची राजधानी सनाच्या पश्चिमेस मनख संचालनालयाच्या हरज भागात ल-हुतैब नावाचे एक गाव आहे. या गावाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येतात. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की, या गावात कधीही पाऊस पडत नाही. याचे कारण म्हणजे हे गाव पृथ्वीपासून 3200 फूट उंच डोंगरावर वसले आहे.
खास सांगायची गोष्ट म्हणजे हे गाव ढगांच्यावर स्थित आहे. त्यामुळे या गावातून अनेक सुंदर दृश्ये दिसतात. या गावात अनेक सुंदर घरे आहेत. म्हणूनच पर्यटक या गावाचे सौंदर्य पाहण्यासाठी येतात. जर तुम्हाला कधी येमेनला जायचे असेल तर या गावाला भेट द्या. या गावाचे सौंदर्य पाहून तुमचे मन देखील प्रसन्न होईल.

from https://ift.tt/3HHREY2

By News

Leave a Reply

Your email address will not be published.