…म्हणून प्रवासात काही लोकांना उलट्या होतात!

Table of Contents

कार किंवा बसमध्ये लांबच्या प्रवासादरम्यान अनेकांना मळमळ होते, उलट्यांचा त्रास होतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का? असे फक्त प्रवासादरम्यानच का होते? किंवा हे फक्त ठराविक लोकांनाच का होते? चला, तर यामागील कारण आणि उपाय जाणून घेऊयात…
प्रवासात उलट्या होण्याला मोशन सिकनेस म्हणतात. हा आजार नाही. परंतु ही अशी स्थिती आहे, जेव्हा आपल्या मेंदूला कान, डोळे आणि त्वचेतून वेगवेगळे सिग्नल मिळतात. यामध्ये मध्यवर्ती मज्जासंस्था गोंधळून गेलेली असते. मात्र जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर यापासून मुक्त होणे सोपे आहे.
विशेषतः अशा लोकांनाही प्रवासादरम्यान वाहनाच्या मागील सीटवर बसणे टाळावे. कारण मागच्या सीटवर वेग जास्त जाणवतो, तसेच त्यावर दचके सुद्धा जास्त जाणवतात.
जर तुम्हाला प्रवासात उलट्यांचा त्रास होत असल्यास पुस्तक वाचू नका. कारण यामुळे तुमच्या मेंदूला चुकीचा संदेश जातो.
जर तुम्हाला उलट्यांचा जास्त त्रास होत असेल तर गाडीची खिडकी उघडून बाहेरची ताजी हवा घ्या. अनेकदा गाडीत ताजी हवा नसल्याने उलट्यांचा त्रास जाणवू शकतो.
रिकाम्या पोटी प्रवास केला तर उलट्या होणार नाहीत हा समज लोकांमध्ये आहे, मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रवासात हलका आणि सकस आहार घेऊनच प्रवास करा.
प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होत असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी खालील सोपे उपाय करा.
● प्रवासाला जाताना एक लिंबू सोबत ठेवा. मळमळ वाटत असेल तेव्हा लगेच या लिंबाचा सोलून वास घ्या. याने तुम्हाला फ्रेश वाटेल.
● लवंगा भाजून बारीक करून एका डब्यात ठेवा. प्रवासाला जाताना ते सोबत घ्या. उलट्या होत असल्यास चिमूटभर साखर किंवा काळे मीठ टाकून चोखत रहा.
● तुळशीची पाने चघळल्याने उलट्या होणार नाहीत. याशिवाय लिंबू आणि पुदिन्याचा रस एका बाटलीत काळे मीठ टाकून ठेवा आणि प्रवासादरम्यान थोडे-थोडे प्या.
● लिंबू कापून त्यावर काळी मिरी आणि काळे मीठ शिंपडा आणि चाटून घ्या. यामुळे उलट्या होणार नाहीत.

from https://ift.tt/3xUrP2o

Leave a Comment

error: Content is protected !!