मोबाईल नंबर १० आकडीच का असतो?

Table of Contents

मोबाईल क्रमांक नेहमी १० आकड्यांचा का असतो? याचा विचार कधी केला आहे का? नसेल तर आज त्याचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात…

१० आकडी मोबाईल नंबर मिळण्यामागे सरकारची राष्ट्रीय नंबरिंग योजना हे कारण आहे. मोबाईल नंबर १ अंकी असल्यास ० ते ९ पर्यंत केवळ १० जणांनाच वेगवेगळे नंबर मिळाले असते. त्यामुळे १० नंबर तयार होतील आणि केवळ १० जणच त्यांचा वापर करू शकतील. जर २ अंकी नंबर असेल तर ० ते ९९ पर्यंत १०० नंबर तयार होतील आणि १०० जणच त्यांचा वापर करू शकतील.

१० आकडे असण्यामागचं दुसरं कारण म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या. देशाची सध्याची लोकसंख्या १३० कोटीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ९ आकडी मोबाईल नंबर दिला गेल्यास भविष्यात सगळ्यांना मोबाईल नंबर मिळणार नाही. १० आकडी मोबाईल नंबर असल्याने एक हजार कोटी नंबर्स तयार होतील हा विचार करून मोबाईल नंबर्स १० आकडी ठेवण्यात आले आहे.

देशात २००३ पर्यंत ९ आकडी मोबाईल नंबर होते. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता ट्रायनं मोबाईल नंबर १० आकडी केले. १५ जानेवारी २०२१ पासून लँडलाईनहून फोन नंबर लावताना त्यापुढे शून्य लावण्याची सूचना दिली. यामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवांसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त नंबर उपलब्ध झाले.

from Parner Darshan https://ift.tt/3ChlChj

Leave a Comment

error: Content is protected !!