
दिवाळी आली कि, उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली ही जाहिरात कानावर आलीच म्हणून समजा. गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी आणि ही जाहिरात यांचे एक वेगळेच समीकरण बनले आहे. चला, तर आज मोती साबणाची जन्म कहाणी आज पाहूयात…
70 च्या दशकात टाटा ऑईल मिल्सने (टॉमको) मोती साबणाची निर्मिती केली. हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता. कारण चौकोनी वड्यांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती आकाराने मोठा आणि गोल होता. गुलाब, चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने अगदी सुरुवातीपासून सर्वांची मन जिंकली होती.
त्या काळाच्या त्याची 25 रूपये ही किंमत तुलनेत अधिक होती. मात्र या साबणाने सतत स्वत:ला उच्च आवडीनिवडीशी, दिव्यानुभवाशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवल्याने त्याची पसंती आजही कायम आहे.
पुढे 1993 साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली. दरम्यान हिंदुस्थान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा या संकल्पनेशी याला जोडला. विशेषतः दिवाळीच्या अभ्यंगस्नाना साठी मोती हा साबण वापरला जातो असे बिंबवले गेले. या अगोदर बाराही महिने बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या मोती साबणला आता केवळ दिवाळीच्या अभ्यंगस्नाना साठी वापरल्या जाणाऱ्या साबणाचे स्थान प्राप्त झाले आहे.
2013 मध्ये हिंदुस्तान लिव्हर कंपनीने पुन्हा मोती साबण बाजारपेठेमध्ये प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली अशी टॅग लाईन घेत मोती साबण पुन्हा एकदा सर्वतोमुखी केला. त्यामुळे सध्या दिवाळी आणि मोतीसाबण हे समीकरण अभेद्य बनलं आहे. त्यामुळेच दिवाळीत मोती साबणाशिवाय स्नान अपूर्णच वाटते.
from Parner Darshan https://ift.tt/3pZKA2f