
जीवनातील कटू सत्य म्हणजे मृत्यू. जो जन्मला येणार त्याचा मृत्याचा एक दिवस निश्चित आहे. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का? जेव्हा एखादा माणूस मरतो, तेव्हा त्याच्या नाक व कानात कापूस ठेवला जातो? ही गोष्ट नवीन नाही. मात्र असे का केले जाते? आज त्याबाबत जाणून घेऊयात….
या प्रश्नाचे उत्तर दोन प्रकारे दिले जाऊ शकते. एक विज्ञानाच्या दृष्टीकोनातून आणि दुसरे पुराणाच्या दृष्टीकोनातून…
विज्ञान सांगते की, माणूस जेव्हा मारतो तेव्हा त्याच्या शरीराच्या खुल्या भागातून बरेच प्रकारचे द्रव बाहेर पडतात. यातून दुर्गंध पसरू शकतो. तो येऊ नये म्हणून नाकात आणि कानात कापूस वापरला जातो.
पुराणात मृत्यूला नवीन सुरुवात म्हटले गेले आहे. याच अर्थ मृत्यूनंतर आत्मा एक शरीर सोडतो आणि दुसर्या शरीरात प्रवेश करतो. आत्म्याचे हे कार्य सुलभ करण्यासाठी कापूस घालण्याचे काम गेले जाते.
पुराणात असेही देखील म्हटले आहे की, जर मेंदूच्या वरच्या भागाने आत्मा बाहेर पडला तरच दुसरा जन्म होतो. अन्यथा आत्मा या जगात फिरत राहील. म्हणून मनुष्याच्या मृत्यूनंतर शरीराच्या उघड्या भागांना कापसाने बंद केले जाते.
from https://ift.tt/3wVb4DL