
मुंबई : पुणे महापालिकेमध्ये जात असताना भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. त्या दरम्यान सोमैय्या पायऱ्यांवरून घसरून पडले. मात्र संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करत पुण्यातील संचेती रुग्णालयाचे किरीट सोमय्यांनी आभार मानले आहेत.
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, जे काल महापालिकेत माफीया सेनेनी गुंडगिरी केली होती. कोव्हिड सेंटर प्रकरणाची चौकशी झाली तर उद्धव ठाकरेंना जाब विचारला जाईल आणि त्यांना याचे उत्तर देणे भारी पडणार आहे.सुजित पाटकर, संजय राऊत आणि आदेश देणाऱ्या उद्धव ठाकरें या तिघांवर हत्येचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसारच माझ्यावर हल्ला केला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही तक्रार करणार असून त्यासाठी गुरुवारी दिल्लीत जाणार असल्याचे सोमय्या म्हणाले.
from https://ift.tt/CdS9kDt