
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मानेच्या दुखण्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एच.एन. रिलायन्स रग्णालयात दाखल झाले होते. आज, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया सुरु झाली होती. वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांच्या पथकानं सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली.
आज सकाळी पावणे नऊ वाजता ऑपरेशन यशश्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑपरेशन थिएटरमध्येच आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही वेळ ते भूल दिल्यामुळे विश्रांती घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑपरेशनची माहीती त्यांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांना अनेक दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत होता. आठवडाभरापासून हा त्रास अधिकच वाढला होता. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.
मुख्यमंत्री ठाकरे यांना बुधवारी एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासण्यांनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आधी घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणाही झाली. मात्र पुन्हा एकदा मान व पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला. या नुसारच आज शस्त्रक्रिया करण्यात आली.
from Parner Darshan https://ift.tt/3Hia80Q