मानलं भो ! शरद पवारांच्या स्मरणशक्तीला !

Table of Contents

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस उद्या (12 डिसेंबर )होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सोहळे सुरु झाले आहेत. पवारांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त लेखक, पत्रकार सुधीर भोंगळे यांच्या ‘नेमकचि बोलणे’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. शरद पवारांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. 
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांच्या भाषणांचा काही भाग वाचण्यात आला. त्यानंतर त्या त्या वेळी शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी अभिनेता, कवी किशोर कदम यांनीही पवारांच्याबद्दलचा किस्सा सांगितला. त्यानंतर किशोर कदम यांनी सर्वांना पडणारा प्रश्न शरद पवारांना विचारला. तो प्रश्न होता, शरद पवार सर्वांना नावानिशी कसे ओळखतात?
यावेळी किशोर कदम म्हणाले, आम्ही नट असून पाठांतरात कमी पडतो, तुम्ही नावं कशी लक्षात ठेवता? त्यावर शरद पवारांनी भन्नाट गोष्ट सांगितली. शरद पवार म्हणाले, “राजकारणात फार कमी कष्टानं आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळतं, फक्त तुम्ही समोरच्या माणसाचं नाव लक्षात ठेवा. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातली होती. तिचं काहीतरी काम होतं. मी तिला म्हटलं, काय गं कुसूम मुंबईला कशी, काय चाललंय? तर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली काम होवो न होवो, अशी तिची भावना होती. लोकांचं खूप छोट्या गोष्टीत सुख असतं.
या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या राजकारणात होत्या. पहिले यशवंतराव चव्हाण आणि दुसरे वसंतदादा पाटील. या दोघांनाही कितीही जुना माणूस भेटला तरी ते नाव लक्षात ठेवायचे. या गुणामुळं समाजामध्ये कायमस्वरुपी स्थान प्राप्त व्हायचं यश मिळतं, असंही पवार म्हणाले.

from https://ift.tt/3Gy2b6C

Leave a Comment

error: Content is protected !!