महाराष्ट्राचे टेन्शन वाढविणारी बातमी !

Table of Contents

मुंबई : देशात दिवसेंदिवस ओमिक्रॉन व्हेरिएंट वाढताना दिसत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट भारतातील पाच राज्यांमध्ये पसरला आहे आणि आतापर्यंत एकूण 32 प्रकरणांची नोंद करण्यात आली. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुजरातमधील जामनगरमध्ये दोन तर महाराष्ट्रात सात नवीन रुग्ण आढळले आहेत.आतापर्यंत महाराष्ट्र 17 आणि राजस्थानमध्ये 9 ओमायक्रॉनच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
गुजरातमध्ये तीन, कर्नाटकात दोन आणि दिल्लीत एक अशी प्रकरणं आहेत.गेल्या आठवड्यात, एकूण प्रकरणांपैकी 52% प्रकरणे केरळमध्ये नोंदवली गेली आहेत. सतत 14 दिवसांपर्यंत दररोजच्या प्रकरणं 10 हजारांहून कमी आणि 10 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणां असलेली केवळ दोन राज्य केरळ आणि महाराष्ट्र आहे.डोंबिवलीतील ओमिक्रॉन बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर आता पुण्यातीलही एक ओमायक्रॉन रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. निश्चितच या बातमीमुळे पुणेकरांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, ऑमिक्रॉनचा धोका ओळखून भारतानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवलीय. कारण सुरूवातील दक्षिण आफ्रिकेत आढलेला ओमिक्रॉन बघता बघता भारतात पोहोचला.दक्षिण आक्रिकेतून डोंबिवलीत आलेला तरूणही ओमिक्रॉनबाधित निघाला.
त्यामुळे राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंद घालण्याची मागणी केली होती.दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, कोविड-19 पासून स्वतःचे आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आपण कोविड प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे.

from https://ift.tt/3lXgwS9

Leave a Comment

error: Content is protected !!