
पारनेर : विविध आरोपांमुळे तालुक्यातून बदली झालेल्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांनी नुकताच पारनेर तालुका दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी त्यांच्यावर झालेल्या चौकशीसाठी नेमलेल्या लोकायुक्त समिती समोरची चौकशी टाळण्यासाठी याचना केली.
पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्यावर बेछूट स्वरूपाचे आरोप केल्यानंतर तत्कालीन तहसीलदार यांची जळगाव येथे संजय गांधी निराधार योजना समिती तडकाफडकी बदली करण्यात आली होती मात्र, या बदलीनंतरही त्यांच्या विरोधात अॅड. राहुल झावरे,संदीप चौधरी ज्ञानेश्वर लंके, सुहास सालके या चौघांनी यांनी थेट लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची सुनावणी सध्या सुरू झाली आहे.
यासाठी तत्कालीन तहसीलदार देवरे यांनी तक्रारीतून वाचविण्यासाठी आटापिटा सुरू असून यासाठी त्या नुकत्याच दोन दिवसापूर्वी पारनेर तालुक्यात येऊन गेल्याचे समजते. दरम्यान कारवाई टाळण्यासाठी देवरे यांनी या संबंधितांशी भेटून मोठा अर्जव केला मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद भेटला नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्यावरील पुढील सुनावणीत या संदर्भात काय निर्णय होणार याविषयी तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.
from https://ift.tt/3H6AWjY