
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून खटल्यातील मुख्य आरोपी, पत्रकार बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर दि. १५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. तर दुसरीकडे रेखा जरे यांचा मुलगा रुणाल यांनी थर्डपार्टी अर्ज न्यायालयामध्ये दाखल केला आहे.
रेखा जरे यांच्या हत्येला एक वर्ष उलटून गेले आहे. प्रकरणामध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे असून, घटनेनंतर तीन महिने बोठे फरार होता. त्याला अटक केल्यानंतर त्याची सुरुवातीला पोलीस कोठडीमध्ये आणि नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.
आरोपी बोठे याने नगर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठापुढे अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर गुरुवारी सुनावणी ठेवण्यात आलेली होती.
खंडपीठापुढे रेखा जरे यांचा मुलगा रुणाल यांच्या वतीने थर्ड पार्टी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. या जामीन अर्जावर आता १५ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
from https://ift.tt/3orpmcN