
पारनेर : निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ यांच्या खुन प्रकरणात कट केल्याचा आरोप असलेल्या बबन कवाद यांचा जामीन रद्द करण्याची फिर्यादी रंगनाथ वराळ यांनी उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाकडे केली आहे .
बबन कवाद सध्या जामीनावर आहेत व त्यांना निघोज गावात येण्यासाठी मनाई आहे . परंतु न्यायालयाच्या या अटीचा भंग करून बबन कवाद यांनी गेल्या महीन्यात निघोज ला प्रवेश करून तिथे कुकडी प्रकल्पाची पाणीपट्टी सोसायटीने भरण्यासाठी उपोषण केले होते.
त्यावेळी सदरचे भाषण फेसबूक या समाज माध्यमावर त्यावेळी प्रसारीत झाले होते . त्यांनी या उपोषणा दरम्यान आक्षेपार्ह भाषण केल्याची तक्रार करत त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती . या याचिकेवरील सुनावणी वेळी
कवाद यांच्या भाषणाचा काही भाग न्यायालयासमोर दाखल करण्यात आला होता . कवाद यांच्या भाषणाचा केवळ काही भागच घेण्यात आला . संपूर्ण
भाषणात कुठेही वराळ खुन प्रकरणातील साक्षीदार व फिर्यादी यांना धमकावणारे व दबाव आणणारे वक्तव्य नाही. असा युक्तीवाद कवाद यांच्या वकीलांनी केला.
त्यावर न्यायालयाने कवाद यांच्या संपूर्ण भाषणाचा अनुवाद न्यायालयात उद्याच सादर करा असा आदेश दिला. व निकाल राखून ठेवला आहे . न्यायालय कवाद यांच्या त्या भाषणाची पडताळणी केल्यानंतरच त्यांच्या जामीनाबाबत निकाल देणार आहे . त्यामुळे निघोजचे ते भाषण कवाद यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे .या प्रकणाची सुनावनी खंडपीठाच्या न्यायमुर्ती विभा कंकणवाडी यांच्या समोर झाली . कवाद यांच्या बाजुने वकील चैतन्य धारुरकर यांनी बाजू मांडली.
from https://ift.tt/1374SXa