बजेट नक्की कसं तयार करतात?

Table of Contents

अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. मात्र बजेट किंवा अर्थसंकल्प का? त्यामध्ये काय-काय असतं आणि ते कसं तयार करतात? याबाबत आज सविस्तर जाणून घेऊयात… 
सोप्या भाषेत सांगायचं तर बजेट म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसे गोळा होण्याचा अंदाज आहे? यातले किती पैसे, कुठे खर्च करायचा बेत आहे? हे सांगणारं डॉक्युमेंट होय.
बजेट कसं तयार करतात? तर अर्थखातं, नीती आयोग, वेगवेगळी मंत्रालयं हे सगळे मिळून यासाठी काम करतात. आर्थिक कार्य विभागगातील बजेट डिव्हिजन अर्थसंकल्प तयार करते. वेगवेगळी मंत्रालयं, राज्यं, केंद्रशासित प्रदेश, स्वायत्त संस्था, संरक्षण विभागातली विविध खाती आपल्या मागण्या किंवा खर्चाचा अंदाज बजेट डिव्हिजनला देतात. दरम्यान शेतकरी, उद्योगपती, विविध समित्या आणि अर्थतज्ज्ञांचा सल्लाही घेतला जातो. या नंतर टॅक्सेसबद्दलचे निर्णय घेतले जातात. या सगळ्या निधीची तरतूद आणि करविषयक गोष्टींवर पंतप्रधानांकडून शिक्कामोर्तब झाल्यावर अर्थसंकल्प निश्चित होतो. दरवर्षी एक हलवा सेरीमनी करून बजेटच्या छपाईला सुरुवात होते. मात्र यंदा कोरोनामुळे ते झाले नाही. तसेच सगळे बजेट पेपर्स ऑनलाईन आहेत.
बजेटमध्ये काय-काय असतं? तर अर्थमंत्री बजेटचं भाषण देतात, तेव्हा त्याचे 2 भाग असतात. देशाची सध्याची परिस्थिती, GDP काय आहे? चालू वर्षामध्ये सरकारकडे किती महसूल गोळा होण्याचा अंदाज आहे हे अर्थमंत्री पहिल्या भागात सांगतात. येत्या आर्थिक वर्षासाठीची विविध क्षेत्रांसाठीची, योजनांसाठीची तरतूद, नवीन योजना जाहीर करतात. सरकारचं या वर्षातलं निर्गुंतवणुकीचं उद्दिष्टं काय आहे? वित्तीय तूटचा अंदाज काय आहे? सरकार किती कर्जं घेणार? याविषयीची माहिती पहिल्या भागात सांगितली जाते. दुसरा भाग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबद्दलचा म्हणजेच Direct & Indirect Taxes याबद्दल असतो.

from https://ift.tt/WAeac7FUo

Leave a Comment

error: Content is protected !!