फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस का असतात?

Table of Contents

वर्षातील सर्वात छोटा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना. कारण त्यामध्ये फक्त 28 किंवा 29 दिवस असतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? फेब्रुवारी महिन्यात कमी दिवस का असतात? चला, तर याबाबत आज जाणून घेऊयात…

तसे पाहायला गेले तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कधी 28 तर कधी 29 दिवस येतात परंतु तुम्हाला माहिती आहे का यामागे विशेष असे कारण आहे, ज्या कारणामुळे फेब्रुवारीमध्ये आपल्याला कमी दिवस पाहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊया या बद्दल, यामुळे फेब्रुवारीचा महिना सर्वात छोटा असतो आणि वर्षातील अन्य 11 महिन्यांवर याचा कोणताच फरक आपल्याला पाहायला मिळत नाही.

पृथ्वी सूर्याला संपूर्ण फेरी मारण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लावते आणि म्हणूनच प्रत्येक 4 वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 दिवस वाढवून याचे संतुलन ठेवले जाते. याच वर्षाला लीप ईयर म्हटले जाते. जुन्या रोमन केलेंडरमध्ये महिना मार्च पासून सुरु होतं. त्यावेळी संपूर्ण वर्षाचे 304 दिवस आणि वर्षात 10 महिने होते. नंतर यामध्ये बरीच सुधारणा करण्यात आली. त्यात जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन महिने जोडले गेले.

मग वर्षाचे 12 महिने आणि 355 दिवस झाले. या कॅलेंडरमध्ये सणवार त्याच तारखेला यावे यासाठी यामधून फेब्रुवारीच्या महिन्यातून दोन दिवस कमी करण्यात आले. त्यामुळे वर्षाचे 365 दिवस झाले. हे कॅलेंडर सूर्य आणि पृथ्वीच्या कक्षानुसार तयार केले. कारण पृथ्वीला सूर्याच्या भोवती संपूर्ण भ्रमण करायला 365 दिवस आणि 6 तास लागतात आणि प्रत्येक वर्षात 6 तास शिल्कक राहतात. हेच 6 तास प्रत्येक 4 वर्षानंतर 24 तास म्हणजे एक दिवस बनवतो. हा दिवस फेब्रुवारी महिन्यात जोडण्यात आला. या कारणास्तव फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात.

from https://ift.tt/MqrGFRL

Leave a Comment

error: Content is protected !!