
आपण रात्रंदिवस एक अदृश्य भार वहात असतो.त्याचं नाव प्रपंच.तो कसा करायचा याचं नियोजन अखंडपणे मनात चालु असतं.अर्थिक सुबत्तेने तो सोपा होतो असं वाटत असलं तरी ते पुर्णपणे सत्य नाही. कुटुंबाच्या गरजा पुरवण्यालाच जर कुणी प्रपंच करणं म्हणत असेल तर त्या भ्रमातुन लवकर बाहेर पडले पाहिजे.
बरीच मंडळी कुत्रा पाळतात.त्याला चांगलं चांगलं खायला घालतात पण त्याच्याकडून मालकाच्या अपेक्षा असतात की त्यानं आपलं मनोरंजन करावं,मी सांगेल तसं ऐकावं,त्यानं लाड घालता की आनंद होतो.पण त्यानं योग्य प्रतिसाद दिला नाही की मग मात्र तो नकोसा होतो.एका कुत्र्याकडुन आम्ही ही अपेक्षा करतो,तर चालत्या बोलत्या माणसांकडून घरातल्या सदस्यांकडुन किती अपेक्षा असतील?या अपेक्षा पुर्ण झाल्या नाही तर अपेक्षा भंगाचं दुःख किती यातना देतं?
तुकोबाराय म्हणतात, आयुष्य वेचूनि कुटुंब पोसिलें । काय हित केलें सांग बापा ॥१॥
फुकाचा चाकर जालासी काबाडी । नाहीं सुख घडी भोगावया ॥ध्रु.॥
दुर्लभ मनुष्यजन्म कष्टें पावलासी । दिला कुटुंबासी कामभोग ॥२॥
तुका ह्मणे ऐसें आयुष्य नासिलें । पाप तें सांचिलें पतनासी ॥३॥
मनुष्य जन्म दुर्लभ आहे. तो प्राणीमात्रांसारखाच जर भोगला तर जीवन व्यर्थ आहे.
माकडंही प्रपंच करतात.आपल्या पिलांचं पालनपोषण करतात.आपणही ते जरा वेगळ्या पद्धतीने करतो इतकच.मग आपण नेमकं वेगळं काय करतो?काबाडी,बिनपगारी चाकर ही विशेषणं चिकटलेली आहेतच की! यात सुख शोधतो आहे?सुखाच्या वाटा अनंत आहेत.मुख्य मार्ग मात्र एकच आहे.
रामकृष्णहरी
from Parner Darshan https://ift.tt/31OnEZZ