तप आणि ताप यामध्ये केवळ एक कानाचा फरक आहे. यातला ताप आमचेकडे सतत आहे.तुकोबाराय म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा।करिता या सेवा कुटुंबाची।। संसार ताप न देईल तरच नवल.म्हणूनच संतांनी तापाचं रुपांतर तपात करण्याचा मार्ग सांगितला आहे. योग तप या चि नावे।गिळता व्हावे अभिमाने।। ताप देणाऱ्या गोष्टी वर्ज केल्या की तप सुरू होते.
नाथ महाराज म्हणतात,
तप म्हणिजे नव्हे स्नान । तप म्हणिजे नव्हे दान । तप नव्हे शास्त्रव्याख्यान । वेदाध्ययन नव्हे तप ॥६॥
तप म्हणिजे नव्हे योग । तप म्हणिजे नव्हे याग । तप म्हणिजे वासनात्याग । जेणें तुटे लाग कामक्रोधांचा ॥७॥
शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्धभोगानुरुप । हरि हदयीं चिंतणें चिद्रूप । तप सद्रूप त्या नांव पैं ॥८॥
महाराज म्हणतात, स्नान, दान,शास्रव्याख्यान,वेदाध्ययन,योग यालाच जर तप म्हणत असाल तर ते चुकीचे आहे. तप या व्याख्येत ते बसत नाही. खरी तपाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. तप म्हणजे वासनात्याग,कामक्रोधाचा त्याग.शरिर ताब्यात ठेवणे म्हणजे इंद्रियांवर ताबा मिळवणे याला तप म्हणतात.प्रारब्धभोग !
कुणालाही चुकणार नाही. जे भोग येतील ते स्विकारुनह्रदयात हरिचं चिंतन ठेवणे,सतत सात्विक विचार प्रवाह निर्माण करण्याची क्षमता असणछ म्हणजे ‘तप’आहे.

सज्जनहो असं तप प्रत्येक मनुष्याने करायलग हवे.यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आपलाच संवाद आपणाशी.हा, राजमार्ग आहे. आपणच आपल्या जगण्या वागण्याची समिक्षा केली की तपाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू होते.मी या वाटेवरचा पांथस्थ आहे. थोडं जरी जमलं तरी आनंद आभाळभर आहे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3pO6jZn

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *