हल्ली आपल्या आयुष्यात पैसा सगळ्यात महत्वाची गोष्ट बनली आहे. मात्र चाणक्या नीती पैशांबाबतीत काही वेगळंच सांगते. चला, त्याबाबत अधिक सविस्तर या लेखामध्ये जाणून घेऊयात….
● पैस माणसाचा एक मित्र : चाणक्य नीती पैशाला माणसाचा एक मित्र मानते. जो माणसाच्या चांगल्या वाईट काळात नेहमीच लोकांना मदत करते.

● पैशाचा आव आणू नका : लक्षात घ्या, पैसा तुमचे जीवन सोपं करतं. यामुळे समाजात तुम्हाल सन्मानही मिळतो. मात्र पैशाचा आव आणू नका.
● उत्पन्नापेक्षा अधिकखर्च करू नका : भविष्यातआर्थिक संकटाचा सामना करायचा नसेल, तर उत्पन्नापेक्षा जास्त पैसे कधीही खर्च करू नका. अनावश्यक गोष्टींमध्ये पैसे वाया घालवाल तर भविष्यात अडचणी येऊ शकतात.
● साठवून ठेऊ नका : जर तुमच्याकडे जास्त पैसा असेल, तर साठवून ठेऊ नका. त्याला जमीन, सोने इत्यादींमध्ये गुंतवा. यामुळे वेळ आल्यावर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.
● कल्याण कार्यात वापर करा : तुमच्यकडे जास्त पैसा असेल, तर त्याचा कल्याण कार्यात वापर करा. यातून गरीब आणि आजारी लोकांना मदत करा, मंदिर किंवा धार्मिक स्थळी दान करा.
● सामाजिक कार्यात खर्च करा : पैशाची कमतरता नसेल, तर सामाजिक कार्यात खर्च करा. हॉस्पिटल, शाळा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून लोकांना मदत करा. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढते.

from https://ift.tt/r0MYbjI

By News

Leave a Reply

Your email address will not be published.