नवी दिल्ली :पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. पण आता ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर अखेर मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे.
मोदी सरकारकडून ऐन दिवाळीच्या तोंडावर अखेरीस जनतेला दिलासा देण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं होतं. पण, आता उत्पादन शुल्क कर कमी कऱण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे.
डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवला आहे आणि आगामी रब्बी हंगामात डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केल्याने शेती कामांना चालना मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देशांतर्गत किमतींमध्ये वाढ झाली. पेट्रोलच्या दराने 110 चा आकडा पार केला तर डिझेलचे दरही 100 च्या पुढे गेले.
विरोधकांनी वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. विरोधकांनी देशभरात आंदोलन पुकारले होते. ठिकठिकाणी इंधन दरवाढीवर आंदोलन करण्यात आली. अखेरीस मोदी सरकारने दरवाढीवर तोडगा काढत उत्पादन शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोल 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये कपात करण्यात आली आहे.
तसंच, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यांनाही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट समान प्रमाणात कमी करण्याचे आवाहन सुद्धा मोदी सरकारने केले आहे.
from Parner Darshan https://ift.tt/2ZXI4yX

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *