
2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. त्यातच पुढील टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियातच होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे. ICCनं पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपच्या तारखा आता जाहीर केल्या आहेत.
ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पार पडणार आहे. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये एकूण 45 सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. तर मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 13 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार आहे.
ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांना टी-20 वर्ल्ड कप 2022च्या सुपर 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. तर नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागेल. ओमान (फेब्रुवारी) आणि झिम्बाब्वे (जून व जुलै) येथे दोन पात्रता स्पर्धा होईल आणि त्यातून संघ पहिल्या राऊंडमध्ये सुपर 12मधील अंतिम चार संघांसाठी एकमेकांना आव्हान देतील.
स्पर्धा आयोजनाचे मुख्य ख्रिस टेटली यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियात आयसीसीच्या स्पर्धेच्या पुनरागमनासाठी आम्ही तयार आहोत. टी-20 वर्ल्ड कप 2022साठीच्या सात यजमान शहरांची घोषणा करण्यात आम्हाला आनंद होत आहे.
from Parner Darshan https://ift.tt/3Fns9ZR