
पारनेर : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज (रविवारी) पारनेर तालुका दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली.
तालुक्यातील धाडगेवाडी ते विसापुर रस्ता सुधारणा करणे,ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण सोहळा,
पारनेर कान्हुर रोड ते पुणेवाडी रस्ता सुधारणा करणे,पारनेर कान्हुर रोड ते हत्तलखिंडी रस्ता सुधारणा करणे,विरोली येथे गणपती फाट्यावर समाजिक सभागृह बांधणे,गोरेगाव घाट ते कान्हुर पठार रस्ता सुधारणा करणे,कान्हुर पठार गावातील रस्ता सुधारणा करणे,चारंगेश्वर मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे,गजाबाई / मुक्ताबाई मंदिरासमोर पेव्हरब्लॉक बसविणे,नगर-कल्याण हायवे ते कारेगाव रस्ता सुधारणा करणे या कामांचा शुभारंभ पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने विकास कामांच्या निधीबाबत मोठी कात्री लागली आहे मात्र, असे असतानाही आमदार निलेश लंके यांनी पारनेर – नगर विधानसभा मतदार संघात विकास कामांचा मोठा धडाका लावला आहे. आजही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तालुक्यात कोट्यावधी रूपयांच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.
विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर सायंकाळी पाच वाजता कान्हूर पठार येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
from Parner Darshan https://ift.tt/304xt5i