पारनेर : पारनेर येथील पारनेर पब्लिक स्कूल व ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांंचा उच्चशिक्षण क्षेत्रात नेहमीच डंका वाजत असतो. आता वैद्यकिय क्षेत्रातही या विद्यार्थ्यांनी पारनेर पब्लिक स्कूल व ज्यूनिअर कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
पारनेरचे माजी विद्यार्थी प्रतिक वाळूंज ( एआयआयएमएस नागपूर),सुमित देठे( हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडीकल कॉलेज आणि कुपर हॉस्पिटल जुहू मुंबई ) या दोन विद्यार्थ्यांची शासकीय एमबीबीएस महाविद्यालयासाठी तसेच अनुज पुजारी ( पीआयसीटी पुणे) ज्ञानेश्वरी डोळस ( पीआयसीटी पुणे) विरांगणा पवार( बीकेपीएस आर्किटेक्चर कॉलेज पुणे) व विभा शेटीया ( बीडीएस कॉलेज संगमनेर) येथे निवड झाल्याची माहिती प्राचार्य गिताराम म्हस्के यांनी दिली.
या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास मांडताना विद्यालयाचे प्राचार्य गिताराम म्हस्के सर म्हणाले की, प्रतिक वाळूंज, सुमित देठे व अनुज पुजारी यांनी ज्युनिअर के.जी ते दहावी पर्यंतचे शिक्षण पारनेर पब्लिक स्कूल येथेच पूर्ण केले असून कोरोनाच्या खडतर परिस्थितीत वेगवेगळ्या महाविद्यालयात ११वी व १२वी चे शिक्षण घेऊन अभ्यास करत यश संपादन केले.
पारनेर पब्लिक स्कूल व ज्यु.कॉलेज पारनेर येथे ज्युनिअर के.जी’ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण घेत ज्ञानेश्वरी डोळस, विरांगणा पवार व विभा शेटीया या विद्यार्थीनीनी यश संपादन केले म्हणून त्यांचे आई, वडील व विद्यार्थी यांचे पारनेर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज परिवार, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, डांगे पॅटर्नचे संस्थापक इंद्रभान डांगे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता म्हस्के, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्राचार्य श्री. गिताराम म्हस्के यांनी अभिनंदन केले.

from https://ift.tt/MbJZYsi

By News

Leave a Reply

Your email address will not be published.