पारनेर तालुक्यातील सिमेंट बंधाऱ्यांच्या कामासाठी ३ कोटींचा निधी !

Table of Contents

पारनेर: तालुक्यातील विविध गावांसाठी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या प्रयत्नांतून २० सिमेंट बंधाऱ्यांच्या कामासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयातून स्वीय सहाय्यक संदीप चौधरी यांनी दिली.
तालुक्यातील शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यासाठी विविध ठिकाणी जलाशय निर्माण करून शेतकऱ्यांना बागायती करता येईल व त्या माध्यमातून शेतकरी सुखी होईल. यासाठी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सिमेंट बंधारे राबवण्याचा संकल्प आमदार निलेश लंके यांनी केला. यानुसार तीन कोटी रुपयांच्या २० सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली.
▪मंजूर झालेले बंधारे व निधी
गटेवाडी आंब्याचा ओढा सिमेंट बंधारा १५ लाख, वडनेर हवेली हारदे मळा सिमेंट बंधारा १५ लाख, हंगा साठे वस्ती सिमेंट बंधारा १५ लाख, शहाजापूर संगमाचा डोह सिमेंट बंधारा १५ लाख, नारायण गव्हाण शेळके मळा सिमेंट बंधारा १५ लाख, नारायण गव्हाण रानमळा सिमेंट बंधारा १५ लाख, नारायण गव्हाण नागझरी सिमेंट बंधारा १५ लाख, पळवे बुद्रुक म्हसोबा डोह सिमेंट बंधारा २० लाख, पाडळी रांजणगाव यलदरावस्ती सिमेंट बंधारा १० लाख, पाडळी रांजणगाव मळाईवस्ती सिमेंट बंधारा १५ लाख, अस्तगाव हडोळावस्ती सिमेंट बंधारा १५ लाख, रूईछत्रपती
दिवटे मळा सिमेंट बंधारा १५ लाख वाळवणे शेरीदरा सिमेंट बंधारा १५ लाख, राळेगणसिद्धी मापारीदरा सिमेंट बंधारा १५ लाख, यादववाडी यादववस्ती सिमेंट बंधारा १५ लाख, बाबुर्डी वनीमळा सिमेंट बंधारा १५ लाख, म्हसणे- सुलतानपूर पाचमन ओढा सिमेंट बंधारा १५ लाख, निघोज चेडे वस्ती सिमेंट बंधारा १५ लाख, लोणी मावळा शेळके मळा सिमेंट बंधारा १५ लाख, पावळ गोरडे मळा सिमेंट बंधारा १५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.

from https://ift.tt/3miTkxN

Leave a Comment

error: Content is protected !!