पारनेर : तालुका हा गुणवंतांची खाण असल्याची ओळख संपुर्ण राज्यात आहे असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पारनेर तालुका शाखेच्या वतीने शिवजयंती दिनानिमित्त आयोजित गुरुगौरव सन्मान सोहळ्यात गुरुगौरव, नवहिंदवी युगाचे शिल्पकार व प्रेरणादायी शाळा पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सभापती शेळके बोलत होते.
गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य शिवजयंतीच्या तेजोमय दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केल्याबद्दल गटविकास अधिकारी किशोर माने यांनी संघटना कार्यकारिणीचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यनेते रावसाहेब रोहोकले गुरुजी होते. कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, नगरपरिषेच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत, शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षी तांबे, विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, पदवीधर शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष भिवसेन पवार, बबनराव भालेराव, मच्छिंद्र कोल्हे, संतोष खामकर, बाळासाहेब रोहोकले, संदीप फंड आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना रावसाहेब रोहोकले यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक बंधू भगिनी हेच माझे कुटुंब असल्याचे भावोद्गार काढले. तर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी शिक्षक परिषदेने राबवलेला उपक्रम तालुक्यातील शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी पूरक असल्याचे सांगत मागील आठवड्यात अळकुटी येथील भंडारी कुटुंबियातील भगिनींना एक लाख वीस हजार पाचशे एक रुपयांची रोख मदत तालुका शिक्षक परिषदेने केली. ही देखील अभिमानास्पद बाब आहे असे गटशिक्षणाधिकारी बुगे यांनी सांगितले.
मुख्याधिकारी कुमावत यांनी परिषदेने राबवलेला आठवणींचे एक झाड या पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक करतानाच तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांना नगरपरिषेदेच्या माध्यमातून अधिकाधिक पर्यावरणपूरक व इतर उपक्रमाच्या संधी भविष्यात उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षक बंधू भगिनी व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शाळांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी बुगे व मुख्याधिकारी कुमावत यांना आदर्श प्रशासक म्हणून संघटनेच्यावतीने गौरवण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सीए परीक्षा उत्तीर्ण झालेली कु. प्रगती गागरे व शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेली कु. अनुष्का गजरे या मुलींनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी प्रास्ताविकामध्ये कोकणातील महाड पुरग्रस्त कुटुंबीयांना शिक्षक परिषदेने पाच लाखाची मदत केली. त्याचप्रमाणे कोरोना संसर्ग कालावधीत जवळजवळ चार लाख रुपये जमा करून अन्नदान केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तीन लाख रुपयांची मदत केली त्याचप्रमाणे भंडारी कुटुंबियातील धावपटू भगिनींना एक लाख पंचवीस हजारांची रोख मदत केली. असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून शिक्षक परिषद ही केवळ शिक्षकांचे प्रश्न सोडवणारी संघटना नसून सामाजिक बांधिलकी जपणारे संघटन आहे, असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब रोहोकले, तालुकाध्यक्ष सुनिल दुधाडे, बाबा धरम, संदीप सुंबे,अशोक गाडगे, स्वाती झावरे, संदीप झावरे, शिवाजी कोरडे, बाळासाहेब ठाणगे, ज्ञानेश्वर इंगळे, अनिल धुमाळ यांनी प्रयत्न केले. जिल्हा संपर्कप्रमुख संतोष खामकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप सुंबे, ज्ञानेश्वर इंगळे यांनी केले.
जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी पारनेर पंचायत समिती शिक्षण विभागासाठी क्लार्क, संगणक व प्रिंटरची मागणी केली असता, सभापती गणेश शेळके यांनी सदर मागणी अल्पावधीत पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
अनिल धुमाळ यांची पारनेर तालुका शिक्षक परिषद संपर्कप्रमुखपदी नियुक्ती या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी राज्यनेते रावसाहेब रोहोकले यांच्या आदेशाने जाहीर केली व नियुक्तीचे पत्र त्यांना कार्यक्रम प्रसंगी राज्यनेते रावसाहेब रोहोकले यांच्या तसेच सभापती गणेश शेळके यांच्या हस्ते देण्यात आले.

from https://ift.tt/hTdg4J1

By News

Leave a Reply

Your email address will not be published.