
आळेफाटा : गावठी पिस्तूल व काडतुसे विक्री प्रकरणात पारनेर तालुका युवा सेनेचे उपप्रमुख अजित आवारी याला पोलिसांनी अटक केली आली असून या गुन्ह्यातील त्याच्या इतर सहकार्यांचा पोलीस शोध घेत आहेत.दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघा शेजारीच गावठी पिस्तूल विक्री करून या आरोपींनी थेट गृहमंत्र्यांनाच आव्हान दिले आहे.
या बाबतची माहिती अशी की,पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये पुणे ग्रामीण जिल्हयात अग्नीशस्त्राविरोधी तसेच अंमली पदार्थाविरोधी गुन्हेगाराविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने २५ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीररसागर यांना अशी खात्रीशीर बातमी मिळाली की, मौजे वडगाव आनंद गावचे हददीत आळेफाटा एस.टी. स्टॅन्ड परीसरातील सार्वजनीक शौचालयाजवळ इसमनामे पंकज बाबाजी चाहेर व अमीर मोहम्मद शेख दोघे रा. रांधे ,अळकुटी( ता. पारनेर जि. अहमदनगर) हे दोघे मिळून पिस्तुल व काडतुसे विक्रीसाठी आलेले आहेत त्या अनुषंगाने आळेफाटा पोलीस पथकाने बस स्थानकाचे चौफेर योग्य पद्धतीने सापळा रचून शिताफीने छापा टाकुन पंकज बाबाजी चाहेर, वय २२ वर्षे,अमिर मोहम्मद शेख , वय २४ वर्षे दोघे रा. रांधे अळकुटी यांना ताब्यात घेतले असता त्यांचे कब्जात बेकायदा बिगर परवाना १ गावठी पिस्तुल व २ जीवंत काडतुसे असा एकुण २७ हजार रूपये किंमतीचा माल मिळुन आला.
याबाबत पोलीस हवालदार विनोद गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस ठाण्यात गुरजिनं ४१०/२०२१, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करणेत आलेला असुन त्यावरून सदर आरोपीना पिस्तुल व काडतुसे पुरविणाऱ्या त्यांचे म्होरक्यापैकी आरोपी अजित पोपट आवारी रा. रांधे अळकुटी यास अटक करणेत आली असुन अनिल आवारी हल्ली मुक्काम कामोठे, मुंबई ( मुळ रा. रांधे ता. पारनेर) याचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अभिनय देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर,उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे, निखिल मुरूमकर, मोहन आनंदगावकर यांचे पथकाने केली असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे हे करीत आहेत.
from https://ift.tt/3eqpmE3