
मुंबई :सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून येणाऱ्या विविध विकास योजनांसाठी पारनेर तालुक्याला भरीव निधी मिळावा असे साकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी घातले. दरम्यान,पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्याला आपल्या खात्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याची विनंती श्री. रोहोकले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पारनेर तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली केली. तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याची विनंती रोहोकले यांनी मंत्री शिंदे यांच्याकडे केली यावर तालुक्यातील प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
या सदिच्छा भेटी प्रसंगी अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिलशेठ शिंदे, अनिलशेठ लोखंडे, भिंगार कँटोन्मेंट बोर्डचे उपनगराध्यक्ष प्रकाश फुलारी ,उद्योजक श्रीनिवास झवर हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी नगरचे माजी नगरसेवक सर्वश्री शिंदे व लोखंडे यांनीदेखील नगर शहरातील विविध प्रश्नांबाबत मंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली या वेळी नगर शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन नाही शिंदे यांनी दिले.याबाबत लवकरच कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिली.
पारनेर तालुक्यातील रस्ते व विविध प्रश्नांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे भेट घेऊन तालुक्यातील प्रश्नांविषयी चर्चा झाली यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन प्रश्न सोडविण्याचे तसेच तालुक्याच्या विकासात भर घालण्याचे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले.
विकास रोहोकले
शिवसेना तालुकाप्रमुख, पारनेर
from https://ift.tt/Ix08SAJ