पारनेर : नगरपंचायतीच्या निवडणूकीत मतदारांनी कोणालाही स्पष्ट बहुमत दिले नसले तरी शुन्यातून सुरूवात करीत राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकल्या यात समाधान आहे. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी सोबत असायला हवा याची जाणीव नव्या सदस्यांना आहे. त्यामुळे पारनेरचा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल असा विश्‍वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी प्रभाग क्र.९ मधून विजयी झालेल्या हिमानी नगरे या युवतीचा सत्कार केला. माजी नामदार विजयराव औटी यांच्या पत्नी जयश्रीताई औटी यांचा पराभव करून विजयी झालेल्या हिमानीचे आ. लंके यांची विशेष कौतुक केले.
आमदार लंके म्हणाले की, पारनेर शहराचा विकास करण्याचा माझा ध्यास आहे. मतदारांनी जो कौल दिलाय तो आम्हाला मान्य आहे. तरीही पारनेर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीला काही सदस्यांनी साथ देण्याची ग्वाही दिलेली आहे. मला पारनेर शहर एक मॉडेल म्हणून राज्यात उभे करायचे आहे. विशेषतः पारनेर शहराची पाणी योजना पूर्णत्वास नेण्याचे माझे स्वप्न आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसाठी निघी देण्याची घोषणा केली असून ही योजना पुर्ण झाल्याशिवाय आपण शांत बसणार नसल्याचे आ. लंके म्हणाले.
माइया काही सहकाऱ्यांचा पराभव झाला, लोकशाहीमध्ये जय पराजय सुरूच असतो. जय पराजय स्विकारून पारनेर शहराचा विकास करण्याचे माझे ध्येय आहे. ते मी पुर्ण करणार असल्याचे सांगतानाच नगरविकास खात्याचा सर्वाधिक निधी पारनेरसाठी खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आ. लंके म्हणाले.
या निवडणूकीमध्ये आम्ही सर्व सक्षम उमेदवार दिले होते. मतदारांनी त्यांना नाकारले असले तरी त्यांना आपण साथ देणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले. ते म्हणाले, माइया विचारांचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्‍नांची तड लावण्यासाठी सदैव हजर असतील.

from https://ift.tt/34V0geL

By News

Leave a Reply

Your email address will not be published.