✒ सतीश डोंगरे
शिरूर: शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे विज कनेक्शन कट करण्याची कारवाई थांबवावी, शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, हाय टेंशन पोल बसवलेले भाडे तसेच नुकसान भरपाई देण्यात यावी,या मागण्यांसाठी येत्या २३ जानेवारी २०२२ पासून विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतकरी बारा महिने वीज वापरत नाही. विद्युत मंडळाकडून केवळ आठ तास वीज दिली जाते. काही भागात केवळ २० टक्के शेतकऱीच याचा वापर करतात. नवीन वीज जोडणी साठी अनामत रक्कम शेतकऱ्यांकडून घेऊन संपूर्ण खर्च महावितरणने करावयाचा असतो तरी देखील शेतकऱ्यांना आर्थिक भार सोसावा लागतो. शेतकऱ्यांची रोहित्र निकामी झाल्यानंतर महावितरणने ४८ तासात विनाशुल्क दुरुस्त करून द्यावी असे असतानाही शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

शेतकऱ्यांचे पैसे महावितरणकडे पडून असताना शेतकरी वीज बिल देणे लागत नाही तरीही शेतकऱ्यांना वीज बिल भरणा सक्ती केली जात आहे, अशा तब्बल चोवीस मागण्यावरून संजय पाचंगे यांनी आंदोलन पुकारून महावितरण कंपनीला आव्हान दिले आहे. कोरोनाचे कारण पुढे करून आंदोलन दडपण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला तरी हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे. शासनाला जर शेतकऱ्यांचा आवाज ऐकू जात नसेल तर औद्योगिक क्षेत्र देखील चालू देणार नाही. याशिवाय महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी विरोधात फौजदारी कायदा कलम १५४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे ठरवले आहे. अशी गुंडगिरी करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या मुघलशाही प्रशासनाच्या विरोधात मागील टोल आंदोलना सारखेच शेतकरी आंदोलन पुकारले जाईल. असा इशारा पाचंगे यांनी यावेळी दिला.

आपल्या शेतातील विद्युत खांबाचे रितसर भाडे मिळावे यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी विद्युत मंडळाकडे अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहनही पाचंगे त्यांनी यावेळी केले.यावेळी शहरातील सिल्वर स्पून हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपाचे पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे ,जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे, माऊली भैरट, व्यापारी संघाचे भाजपचे शहर अध्यक्ष बाबुराव पाचंगे, रेश्मा शेख, वर्षा काळे, सुवर्णा खेडकर, सुरेश थोरात, नितीन पाचरणे, मितेश गादिया, नवनाथ जाधव , भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष उमेश शेळके, वैशाली ठुबे, राजू शेख, शिरूर तालुका भाजपा युवा मोर्चाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष गोरक्ष धुमाळ, युवा कार्यकर्ते विकास तास्कर आदी उपस्थित होते.

from https://ift.tt/3qH5u6r

By News

Leave a Reply

Your email address will not be published.