
पारनेर : येथील पारनेर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी पल्लवी रामदास दाते हिची गुजरात राज्यातील पाटण ब्रँचमध्ये कृषी विस्तार अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य गिताराम म्हस्के यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
पल्लवीचा शैक्षणिक प्रवास मांडताना विद्यालयाचे प्राचार्य गिताराम म्हस्के म्हणाले की, ज्युनिअर के.जी ते दहावीपर्यंतचे शिक्षण तिने पारनेर पब्लिक येथेच पूर्ण केले नंतर ११वी, १२वी विद्याधाम प्रशाला शिरुर व कृषी शिक्षण कराड व पुणे येथे पूर्ण करुन कोरोना काळात कृषी विस्तार अधिकारी पदाच्या परीक्षेचा अभ्यास केला व यश संपादन केले.
या विद्यार्थीनीने विद्यालयाला पुस्तके घेण्यासाठी १३ हजार रुपयांची रोख रक्कम भेट दिली.म्हणून तिचे आई ,वडील व विद्यार्थीनी पल्लवी रामदास दाते हीचे पारनेर पब्लिक स्कूल व ज्यु.कॉलेज परिवार, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे, डांगे पॅटर्नचे संस्थापक इंद्रभान डांगे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता म्हस्के, शिवाजी खामकर, योगेश दुधाडे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्राचार्य गिताराम म्हस्के यांनी अभिनंदन केले.
from Parner Darshan https://ift.tt/3ETdJAx