
नगर :लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी (देहराडून) येथे नव्याने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा (यु.पी.एस.सी.) पास झालेल्या एकूण ७६१ आय.ए.एस., आय.पी.एस., आय. आर. एस., आय.एफ. एस. बॅचचे दि. ५ डिसेंबर २०२१ पासून अकादमीत नवनियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु होत असून दि. ६ व ७ डिसेंबर २०२१ या दोन दिवस भारतीय विदेश सेवा, भारतीय वनसेवा अधिकाऱ्यांना पद्मश्री पोपटराव पवार मार्गदर्शन करणार आहेत.
सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना देशातील विविध राज्यामध्ये वरिष्ठ पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे. पद्मश्री पवार सन १९९५ पासून मसुरी येथील अकादमीत अधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत.
from https://ift.tt/3DpOO6y