वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसीच्या दौऱ्यावर होते. वाराणसीत दाखल होताच त्यांनी काल भैरव मंदिरात जाऊन पूजा-आरती केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी पुढील कार्यक्रमासाठी आपल्या गाडीतून निघाले. पण वाराणसीच्या जनतेने केलेल्या जोरदार स्वागताने पंतप्रधान मोदी भारवले. पंतप्रधान मोदी स्वतः कारमधून उतरले आणि जनतेला अभिवादन केले.

पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी जात असताना वाराणसीतील जनतेने रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली. नागरिक पंतप्रधान मोदींच्या कारवर पुष्पवृष्टी करत होते. वारणासीतील काहींनी पंतप्रधान मोदींना पगडी घालण्याचा आग्रह केला. सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना रोखले. पण पंतप्रधान मोदींही स्वतःला थांबवू शकले नाही. त्यांनी प्रोटोकॉल तोडत ज्येष्ठ नागरिकांकडून पगडी घातली. हसत मान स्वीकारला आणि ज्येष्ठ नागरिकाला हात जोडून नमस्कार केला.

वाराणसीच्या गल्ल्यांमधून पंतप्रधान मोदींचा ताफा निघाला. यावेळी पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी गेली. हर हर महादेव… बम बम भोले… असा जयघोष करत नागरिकांनी त्यांच्या कारवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली.
यानंतर पंतप्रधान मोदी गंगेच्या घाटावर गेले आणि तिथून क्रूजद्वारे गंगा नदीतून पुढे गेले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी गंगास्नानही केले.

from https://ift.tt/3dIn7eV

By News

Leave a Reply

Your email address will not be published.