पारनेर : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर पंचायत समिती गणाच्या सदस्या सुप्रियाताई अमोल साळवे यांच्या रुपाने टाकळी ढोकेश्वर गणाला काम करणारा सदस्य निवडून दिला.याचे सदैव समाधान राहील असे मत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक अरुणराव ठाणगे यांनी व्यक्त केले. 
तिखोल येथे सुप्रियाताई अमोल साळवे यांच्या प्रयत्नातुन सोनारी वस्ती रस्त्याच्या मुरुमीकरण व दुरुस्तीचा शुभारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला त्या वेळी अरुणराव ठाणगे बोलत होते. सौ.सुप्रियाताई साळवे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून तिखोल गावात केलेल्या मळगंगा माता मंदिर प्रांगणास प्लेव्हर ब्लॉक,स्ट्रिट लाईट, वैयक्तिक लाभाच्या योजना,बैठक बाकडे या कामासाठी अरुणराव ठाणगे यांनी त्यांचे गावाच्या वतीने आभार मानले.
यावेळी अमोल,साळवे,मोहन रोकडे, माजी चेअरमन नागचंद ठाणगे, माजी सरपंच सुभाष ठाणगे, नबाजी मंचरे,आप्पा ठाणगे, आनंदा ठाणगे, शिवाजी नाना ठाणगे ,सोनु मंचरे,महेश ठाणगे, शिवाजी ( पप्पू)ठाणगे, योगेश ठाणगे, लक्ष्मण ठाणगे,भानुदास ठाणगे, बाळासाहेब ठाणगे, रामदास ठाणगे,बाळासाहेब मंचरे ( गुरूजी ), सुहास ठाणगे, वैभव ठाणगे, प्रतिक ठाणगे ,मालुजी मंचरे (गुरूजी ) ग्रामपंचायत सदस्य राजू ठाणगे,समाधान ठाणगे, राहुल ठाणगे, विजय ठाणगे, किरण धरम, विजय ठाणगे अमोल मंचरे , पिनू मंचरे, पोपट मंचरे,दत्ता ठाणगे,अक्षय ठाणगे, रावसाहेब मंचरे,योगेश तांबडे, सखाराम मंचरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

from https://ift.tt/3DPjnCJ

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *