पारनेर: नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून या काळात दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनाची पूर्तता करणारच अशी ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली.
‘पारनेर दर्शन’च्या वतीने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.अॅड.राहुल झावरे, दीपक अण्णा लंके, पत्रकार विजय वाघमारे, देविदास आबूज, सुहास नगरे, सुदेश आबुज, रावसाहेब ठाणगे आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार लंके म्हणाले की, पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. पिण्याचे पाणी हा या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा होता या मुद्द्यावरच ही निवडणूक सुरू आहे मात्र, निवडणुकीपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पारनेर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निधी देण्याची घोषणा केली असून येत्या वर्षभरात ही योजना मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही आमदार लंके यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व १३ प्रभागातील उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पारनेर नगरपंचायत अस्तित्वात येऊन पाच वर्ष झाली, राज्यात सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांना पारनेर शहराचा विकास करता आला नाही त्यामुळे शहरवासीयांना विविध सुविधांपासून वंचित राहावे लागल्याची टीकाही आमदार लंके यांनी केली.
आगामी काळात पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेबरोबरच क्रीडा संकुल, बसस्थानक, वातानुकूलित नाट्यगृह, नगरपंचायतीची स्वमालकीची सुसज्ज इमारत, म्हाडा अंतर्गत घरकुल योजना, उपजिल्हा रुग्णालय,स्मारकांचे सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, सेनापती बापट तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विकास,अग्निशामक केंद्र, पारनेर शहराच्या व्यापारी वाढीसाठी भव्य व्यापारी संकुल आदी विकास योजना राबविण्याचा मानसही आमदार लंके यांनी यावेळी व्यक्त केला.
पारनेर शहरातील विविध भागात पाच कोटी रुपयांच्या विकासकामांचा निधी मंजूर झाला असून अन्य १ कोटी ८७ लाख ३० हजार रुपयांच्या कामांनाही मंजूरी मिळाल्याचेही आ.लंके यांनी सांगितले.
निलेश लंके हेच उमेदवार असल्याचे समजून पारनेर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन करीत पारनेर शहराच्या शहरीकरणासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही आ. लंके यांनी दिले.

from https://ift.tt/3sB9pDl

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *