
पारनेर :सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेऊन समाजकारणाचा वसा जपणाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने आता महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.या व्यासपीठाच्या माध्यमातून महिला, युवतींचे प्रश्न अधिक परिणामकारकरित्या सोडविण्यात येणार आहेत. महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून ऐरोली सेक्टर १६ (मुंबई) येथील निर्मला संदीप लटांबळे, तर सचिव म्हणून शालिनी खोडदे यांची नियुक्ती करण्यात आली. आ. लंके तसेच मुंबई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेशशेठ धुरपते यांच्या हस्ते लटांबळे व खोदडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
आ.निलेश लंके यांनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी निलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना करून त्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची तड लावण्यासाठी व्यासपीठ निर्माण केले.त्यामध्ये महिलांचाही सहभाग असे. प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून आ. लंके यांची विधानसभेची निवडणूक तसेच त्यानंतर कोरोना महामारीसोबत केलेल्या संघर्षातही पुरूषांच्या बरोबरीने महिलांनीही परीश्रम घेतले.
महिलांच्या देवी दर्शनाच्या आयोजनातही महिलांचीच आघाडी असल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या महिलांच्या रॅली लक्षवेधी ठरल्या.
संघटनेमध्ये काम करताना महिलांची कुचंबना होऊ नये यासाठी आता महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ मिळाल्याने महिला भगिनींनी आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना अध्यक्ष लटांबळे व सचिव खोडदे यांनी सांगितले की निलेश लंके प्रतिष्ठानमध्ये आम्ही सुरूवातीपासून सक्रिय होतो. आता स्वतंत्र व्यासपीठ मिळाल्याने आम्ही महिलांसाठी अधिक सक्षमपणे काम करू शकतो. शहरामध्ये महिला, युवतींचे अनेक प्रश्न असतात. या व्यासपीठाच्या माध्यमातून ते सोडविण्यात येतील.
महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात हे व्यासपीठ संघर्ष करील.त्याबरोबरच समाजमधील बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल असे त्या म्हणाल्या.
आ. लंके म्हणाले, सेवाभावी वृत्तीने निलेश लंके प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते २४ तास काही ना काही कामे करीत असतात. त्यामागे केवळ सेवाभाव हाच त्यांचा हेतू असतो. महिला आघाडीच्या माध्यमातून हे काम प्रभावी हाईल. महिलांचे प्रश्न मार्गी लागतील.
निलेश लंके प्रतिष्ठानच्या महिला आघाडीच्या मुंबईमध्ये विविध ठिकाणी शाखांची स्थापना करण्यात आली असून लवकरच त्याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कैलास पावडे, खजिनदार सुुनिता कदम, नितीन चिकणे, दिनेश घोलप,दिलीप घुले, योगेश पवार, समर नवले, आहेर सर, गोविंद साबळे, चंद्रकांत नवले, अजित मोरे, किरण जमदाडे, सचिन वाफारे, प्रियंका माने, सुनिता हुलेे, माधुरी परदेशी, मनिषा देसाई, शशिकला जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
from Parner Darshan https://ift.tt/3GMDpk8