✒ सुदेश आबूज
पारनेर: नगरपंचायतीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सध्यातरी सत्तास्थापनेसाठी त्रिशंकू अवस्था आहे. पण याही परिस्थितीत आमदार निलेश लंके यांनी बहुमतासाठी लागणारी ‘मॅजिक फिगर’ जुळवली आहे. त्यामुळे नगरपंचायतीवर आता राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार आहे.
नगरपंचायत निवडणुकीत माजी नामदार विजयराव औटी व विद्यमान आमदार निलेश लंके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पाणी प्रश्न हाच या निवडणुकीतील मुद्दा होता परंतु निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आमदार निलेश लंके यांनी पारनेर शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे अभिवचन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून पिंपळनेर येथे एका कार्यक्रमात वदवून घेतले होते.निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हाच मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. याच मुद्द्यावर मतदारांनी आमदार निलेश लंके यांच्यावर विश्वास ठेवत सर्वाधिक ७ नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून दिले.मात्र सत्तेचा सोपान गाठण्यासाठी आणखी दोन नगरसेवकांची आवश्यकता होती. परंतु आमदार लंके म्हणतात तसे, “निलेश लंके एवढा सोप्पा माणूस नाही” त्यांनी कालच सत्तास्थापनेची ‘ मॅजिक फिगर’ गाठण्याची व्यवस्था केली.
शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक अकराच्या दुसऱ्यांदा विजयी झालेल्या नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आज सकाळीच राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आणखी एका नगरसेवकाने कालच आमदार लंके यांची साथ केल्याने पारनेरचे नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार आहे.दरम्यान, आणखी काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता व एका पदाधिकाऱ्याने ‘पारनेर दर्शन’शी बोलताना व्यक्त केली.
पारनेर शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ सुरेखा अर्जुन भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी सकाळी प्रवेश करून राजकीय धक्का दिला आहे. तर दुसरीकडे या पारनेर नगरपंचायती मध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ७ वरून ८ वर पोहोचले असून नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल असा आत्मविश्वास पुन्हा एकदा आमदार निलेश लंके यांनी बोलून दाखवला आहे.
पारनेर नगर पंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ७ शिवसेना ६ शहर विकास आघाडीला २ भाजपला १ अपक्ष १ असे संख्याबळ असताना पारनेर नगरपंचायत त्रिशंकु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. शहर विकास आघाडीचे प्रमुख व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून पारनेर शहरामध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी सुरू आहे.
नगरसेविका सुरेखा भालेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ आता वाढले आहे.
पारनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आज (गुरुवारी) आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपंचायती मधील बलाबल संख्या आठ एवढी झाली आहे.
सौ. सुरेखा भालेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्यावेळी माजी उपनगराध्यक्ष व शहर विकास आघाडीचे प्रमुख चंद्रकांत चेडे, नगरसेवक नितीन अडसूळ, प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन, आत्मा कमिटीचे अध्यक्ष अॅड राहुल झावरे, राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे,बाळासाहेब मते, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, डॉ.सादिक राजे, बाळासाहेब नगरे, अॅड. गणेश कावरे, बबनदादा चौरे,सचिन नगरे, रायभान औटी, विजय औटी,सचिन औटी उपस्थित होते.
पारनेरचा शहराचा जिव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न आमदार निलेश लंके हेच सोडवू शकतात यावर आपला विश्वास असल्याने या महत्त्वाच्या प्रश्नाबरोबरच प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
 नगरसेविका सुरेखा भालेकर

from https://ift.tt/3nDA1A4

By News

Leave a Reply

Your email address will not be published.