
पारनेर : तालुक्यातील निघोज येथील विविध विकास कामांसाठी आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नाने तसेच जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई संदीप वराळ यांच्या प्रयत्नातून 65 लाखांचा तर म्हस्केवाडी येथील गणेश देवस्थानच्या परिसर सुशोभिकरण व पथ दिव्यांसाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विकासाची घोडदौड सुरु आहे. कोरोना संकटाच्या काळात विकासकामांच्या निधीला कात्री लागली असतानाही आमदार लंके यांनी तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी प्राप्त केला आहे. निघोज येथील सिमेंट बंधारे, रस्ते, गावांतर्गत रस्ते, पथदिवे यासाठी सुमारे 65 लाखांचा तर म्हस्केवाडी येथील गणेश देवस्थानसाठी 30 लाख रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे.
याकामी जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई संदिप वराळ यांनीदेखील पाठपुरावा केला होता.
निघोज येथील (चेडे वस्ती) सिमेंट बंधारा 15 लाख, निघोज मुकामळा रस्ता करणे 10 लाख, कुंडरोड ते ठुबे वस्ती रस्ता करणे 10 लाख, निघोज गावांतर्गत रस्ता करणे 10 लाख, गावांतर्गत पथदिवे बसवणे 10 लाख निघोज गावांतर्गत रस्ते,चेडे वस्ती ते ठुबे वस्ती रस्ता करणे 10 लाख अशी निघोज गावात 65 लाखांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
तसेच याच जिल्हा परिषद गटातील म्हस्केवाडी येथील गणेश देवस्थानच्या परिसर सुशोभीकरणासाठी 15 लाख तर देवस्थान परिसरात पथदिवे बसविण्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आमदार निलेश लंके यांनी निघोज व म्हस्केवाडी देवस्थान साठी एकत्रित 95 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल निघोजच्या सरपंच चित्रा सचिन वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी तसेच निघोज व म्हस्केवाडी ग्रामस्थांनी आमदार लंके,जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई वराळ यांचे आभार मानले आहेत.
from https://ift.tt/3yTCvyS