अवघ्या काही तासांवर नवीन वर्ष येऊन ठेपले आहे. अशात आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांचीच चढा ओढ असते. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत. नव वर्षाचे शुभेच्छा संदेश…
● यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.
● झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा. देवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात तुमच्या सर्व इच्छा.
● खूप प्रेमळ होता 2021 चा प्रवास, अशीच राहो 2022 मध्येही आपली साथ.
● नव्या वर्षाच्या सकाळ समवेत, तुमचं आयुष्य व्हावं प्रकाशमान, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या शुभेच्छा अपरंपार.
● नवीन वर्ष घेऊन आलं आहे नवी पहाट, चला जग बदलूया, नववर्षाभिनंदन!
● नव्या वर्षात संपून जाऊ देत शंका- कुशंका, राग-रुसवे… तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
● येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, नववर्षाभिनंदन!
● हे साल तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी, आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
● सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
● घेऊनी नवी उमेद ,नवी आशा, होतील मनातील पूर्ण इच्छा.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

from https://ift.tt/3qFTeSv

By News

Leave a Reply

Your email address will not be published.