सध्या तंत्रज्ञानाच्या युगात जवळपास सर्वच गोष्टी स्मार्ट झाल्या आहेत. मात्र यासाठी चांगल्या कनेक्टिविटीची गरज आहे, एवढं नक्की. हल्ली वायफायच्या रेंजला मर्यादा असली तरी यावरही तोडगा सापडलाय. वायफायच्या नव्या तंत्रज्ञानामुळे आता 1 किलोमीटरपर्यंत रेंज मिळेल असा दावा केला जातोय. या नव्या तंत्रज्ञानाचं नाव Wi-Fi Halow असं आहे.
नवं तंत्रज्ञान आहे तरी काय? : या तंत्रज्ञानाला हेलो बोललं जात आहे. यामुळे इंटरनेट ऑफ थिंग्सवर फोकस करण्यात आलाय. याचा उद्देश औद्योगिक, कृषि, स्मार्ट सिटी अशा ठिकाणी कनेक्टिविटी सक्षम करणे हा आहे. हेलो वायरलेस कनेक्टिविटी अधिक सक्षम करते. भिंती आणि अन्य अडचणींवर मात करत चांगली कनेक्टिविटी देण्याचा याचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) सक्षम उपकरणांसाठी कमी उर्जा, उच्च कार्यक्षमता आणि अधिक सुरक्षित वाय-फाय प्रदान करेल. Wi-Fi Halow 1Ghz पेक्षा कमी स्पेक्ट्रमवर ऑपरेट करण्यासाठी विकसित केल्याने ते कमी उर्जा वापरेल. याव्यतिरिक्त ते लांब अंतरावर डेटा प्रसारित करण्यास देखील परवानगी देते. स्पेक्ट्रम देखील कमी असल्याने डेटाचा वेग कमी होण्याची अपेक्षा आहे. तथापि, IoT डिव्हाईसेस आणि उत्पादनांना खरोखरच अल्ट्रा-फास्ट वाय-फाय गतीची आवश्यकता नसते आणि ते कमी डेटासह अगदी चांगले कार्य करू शकतात.
हे तंत्रज्ञान कधी येईल? याबाबत अद्याप माहिती नाही. मात्र 2021 च्या चौथ्या तिमाहित डिव्हाईस सर्टिफिकेशन सुरु होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार ते पुढील वर्षी वापरासाठी उपलब्ध होऊ शकते.

from https://ift.tt/3kKpAcm

By News

Leave a Reply

Your email address will not be published.