ध्यानधारणेची तयारी कशी कराल?

Table of Contents

मागच्या भागात आपण चित्तात मनोमुर्ती स्थापन केली आहे.आता ध्यानधारणा करण्याची तयारी करायची आहे. त्यासाठी वेळेची निवड करावी.शक्यतो पहाटेची वेळ ती ही चार ते पाच अतिउत्तम.सुती कपड्याचे आसन करावे.पायांना रुतणार नाही अशी बैठक करावी.नेहमीची मांडी न घालता उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीवर पोटाजवळ खेटुन ठेवा.त्यामुळे पाठीचा कणा ताठ ठेवण्यास सोपे होईल. कळ लागणार नाही. लक्षात ठेवा पाठीचा कणा ताठच असला पाहिजे.हात गुढघ्यावर ठेवा.कोणतीही मुद्रा करू नये.अगदी सहज बैठकीतच बसावे.आता डोळे मिटा.मनोमुर्तीचे स्मरण करा.ती चित्तात स्पष्ट पहाण्याचा प्रयत्न करा.
बाहेरचा सुक्ष्म आवाज देखील तुमचे लक्ष भंग करणार आहे. त्यासाठी मोबाईल फोनचे इअरफोन मोबाईलला न जोडता कानात घातले तर बाहेरचा आवाज बऱ्यापैकी बंद होईल.आपण ठरवलेली श्रद्धेय मनोमुर्तीची स्पष्ट प्रतिमा लगेच दिसणार नाही. त्यासाठी मनप्रक्षालन क्रियेची सवय करायची आहे. मनप्रक्षालन म्हणजे काय? आपल्या हातुन घडलेल्या वाईट कृत्यांची अंतरमनात क्षमा मागायची आहे.
अगदी साध्यातसाधं खोटं बोलल्याची सुद्धा क्षमा मागायची आहे. हे सगऴ डोळे झाकुनच सुरू ठेवायचं आहे.मनात सतत विचारांची आंदोलनं सुरू राहतील.ते लगेच बाहेर पडणार नाही. पण त्यात अडकु नये.विचारांना योग्य न्याय देऊन त्यांना बाहेर काढणे सोपे आहे. उदा.एखाद्या व्यक्तीला तुम्ही वाईट शब्दात बोललात.ते न्यायिक असेल तरीही नाविलाजाने अशी कृती करावी लागल्याने हे घडले हे मान्य करा.
अभद्र शब्दोपत्ती बद्दल क्षमा मागा.बोलुन चूक झाल्याचे लक्षात आले तर त्या व्यक्तीची लवकरात लवकर क्षमा मागण्याचा संकल्प करा आणि सोडा.अशा पद्धतीने हळूहळू अवांतर कर्माचा बोजा कमी होत जाईल. पुढील घडणाऱ्या कर्मात शुद्धता यायला सुरुवात होईल.मनात शुद्ध विचारांचे बिजीकरण सुरु होईल.चित्तस्थिरीकरण ही सतत करण्याची क्रिया असल्याने तो नित्याचा भाग झाला तर आनंद वाढत जाईल.याचा स्वप्रगतीसाठी कसा फायदा होईल? हे पुढील भागात पाहु.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/fm3JQ1G

Leave a Comment

error: Content is protected !!