
शारिरीक स्वास्थ्य राखण्यासाठी,खास करुन चाळीशीनंतर विशेष खबरदारी घ्यायला हवी.वयपरत्वे ध्यानधारणेची परिपक्वता आहे. पण शारिरीक स्थिती मजबूत नसेल तर आपण ताठ कण्याने बसु शकणार नाही.शारीरिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरतेच.कारण मानसिक स्वास्थ मिळाले की ‘आधी’ म्हणजे मानसिक विकार नष्ट होतात.
‘व्याधी’ म्हणजे शारीरिक पिडा नष्ट होण्यासाठी शरीराला योग्य मार्गाने नेता आले पाहिजे. कारण ध्यानधारणा आणि शरीर एकमेकांना पुरक आहेत पण शरीर तंदुरुस्त नसेल तर त्याचा आनंद घेता येणार नाही.
दहा मिनिटात कमरेला,पाठीला कळ लागते काय करावे?असा एक प्रश्न आला आहे. खरं तर हा प्रश्न लवकर यायला हवा होता.असो आता आपण त्यावर काय केले पाहिजे यावर नव्याने विचार करु.
आपण पहाटे उठायला सुरुवात केली पाहिजे. चार वाजता उठणे अतिउत्तम आहे. पण शक्य होत नसेल तर पाचला उठावे.सौचकर्म आटोपून किमान दोन किलोमीटर फिरुन यावे.बाहेर जाणे शक्य नसेल तर अर्धा तास कदमताल करावा.या दरम्यान घाम यायलाच हवा.थोडा विश्राम करून आंघोळ करुन घ्यावी,आंघोळीचेही एक तंत्र लक्षात ठेवले पाहिजे की पाणी जास्त कडक घेत असाल तर तुम्ही लवकर म्हातारे दिसणार आहात.कोमट पाण्यानेच आंघोळ केली पाहिजे. एकदम थंड पाणी आंघोळीसाठी घेत असाल तर पहिल्यांदा पायावर पाणी घ्यायला सुरुवात करावी.एकदम डोक्यावर पाणी घेऊ नये.पहाटे आंघोळ शक्य नसल्यास हातपाय चेहरा धुवुन ध्यानधारणेसाठी बसावे.(आपल्या ध्यानक्रियेत अजुन गुरु,सदगुरु,नाम समाविष्ट नाही हे लक्षात घ्या.त्याचे महत्त्व पुढच्या भागांमधे येईल.) कपालभाती, अनुलोमविलोम प्राणायाम या क्रिया पुरक आहेत.
एक विशेष गोष्ट लक्षात ठेवावी.आपण पहाटे फिरायला जात असाल तर चालण्याची गती दम लागणारी असावी.त्यामुळे दम लागायलाच हवा.आपला श्वास वाढल्यानंतर जर आपण तोंडाने श्वास घेत असाल तर सारं फिरणं व्यर्थ आहे.पंचर काढण्यासाठी ट्युबमधे हवा भरावी लागते.त्यामुळे भोक पडलेल्या ठिकाणाहुन हवा वेगाने बाहेर पडते.आमची शारीरिक रचना अशीच आहे. सुक्ष्म नाड्यांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त दाबाने तो शरीरात जायला हवा.त्यासाठी श्वास हा नाकानेच घ्यायचा आहे. त्यामुळे तुमच्या शरिरातील बहात्तर हजार नाड्यांमध्ये प्राणवायुचं संचालन वाढणार आहे.फुफुस मजबूत होणार आहे. पाठीला कळ लागण्याचा प्रश्न या क्रियेनेच मिटणार आहे.अनेक शारिरीक व्याधी केवळ श्वासावर अभ्यास केल्याने नष्ट होतात.अशी शारीरिक तयारी झाल्यानंतर स्वस्थ चित्ताने ध्यानाला बसता येईल.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/QivaH20