पारनेर : धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेण्याची ग्वाही जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.

तालुक्यातील ढोकी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्कार केंद्राचे उद्घाटन व धनगर समाज मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.संस्कार केंद्राचे उद्घाटन श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी श्री. दाते बोलत होते.इंजि.डी‌.आर.शेंडगे, दादाभाऊ चितळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुभाष सासवडे, सरपंच मंचरे,थोरात गुरुजी,गावडे सरदार,भांड,दातीर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी संस्कारमय प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपटराव महानोर, उपाध्यक्ष बाबासाहेब नऱ्हे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रमुख पाहुण्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व आजची युवा पिढी साठी संस्कारांची आवश्यकता केंद्राच्या माध्यमातून कशी होऊ शकते हे विशद केले.इंजि.डी.आर.शेंडगे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी सभापती दाते यांच्या व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर समाजाची बैठक करुन सरकारने आरक्षणासाठी केंद्राकडे शिफारस पाठवावी अशी मागणी केली.
यावर सभापती दाते यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे नियोजन करण्याची ग्वाही दिली.तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागात विकासकामे करण्याचे आश्वासनही दाते यांनी दिले.मेळाव्यासाठी जबाजी नऱ्हे,किरण धरम,कैलास नऱ्हे व युवकांनी परिश्रम घेतले.

from Parner Darshan https://ift.tt/3ndW8x4

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *