दैठेणे गुंजाळमध्ये दुर्मिळ जातीचे अजगर : सर्पमित्रांनी वनविभागात केले मुक्त 

Table of Contents

पारनेर : तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथे पायतान जातीचे दुर्मिळ अजगर आढळून आले होते.सरपंच बंटी गुंजाळ यांनी नगर येथील वाईल्ड लाईफ सोसायटीचे आकाश जाधव यांना माहीती दिल्यानंतर सर्पमित्रांनी त्यास पकडुन वनक्षेत्रात मुक्त केले.

याबाबत माहीती अशी की,गावातील डोंगरवाडी परीसरात अशोक येवले यांची शेतजमीन आहे शेतात काम करत असताना त्या ठिकाणी हे अजगर निदर्शनास पडल्यानंतर सरपंच बंटी गुंजाळ यांना येवले यांनी ही माहीती दिली.गुंजाळ यांनी नगर सर्पमित्र आकाश जाधव यांच्याशी संपर्क करून याची माहीती दिली.
त्यानंतर सर्पमित्र अतुल पाखरे,शिराज सय्यद,स्वप्निल पाखरे,विशाल नगरे यांनी घटनास्थळी भेट दिली.या दुर्मिळ अजगरास कोणतीही इजा न होता मोठ्या शिताफीने पकडण्यात आले.

नऊ ते दहा फुट लांबी असणा-या या अजगाराचे २५ ते ३० किलो वजन होते.साधारणतः डोंगराळ व पाण्याच्या भागात ही जात आढळून येते. मोर,छोटे कुत्र्याचे पिल्ले यासह या अजगराचे अन्य खाद्य असते. एमआयडीसी मधील मोकळ्या जागेत देखील हे अजगर आढळून येत असल्याचे सर्पमित्र विशाल नगरे यांनी सांगितले.
नगर येथील केकताई वनक्षेत्रात या अजगरास मुक्त करण्यात आल्याचे अतुल पाखरे यांनी सांगितले.

from Parner Darshan https://ift.tt/3qeRilh

Leave a Comment

error: Content is protected !!