देशात भाजपाला पर्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू !

Table of Contents

नवी दिल्ली : देशात भाजपाला सक्षम पर्याय उभा करण्याच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याचे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे.
दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. काँग्रेसमध्ये दोन टर्म त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर काँग्रेसची फेररचना झाली. त्यामुळे नाराज असलेले योगानंद शास्त्री आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत.
याप्रसंगी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “दिल्ली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन नाही. त्यामुळे आम्हाला येथे जास्त मेहनत करण्याची गरज आहे. अनेक राज्यांमध्ये आमचे सहकारी पक्षांचे संघटन बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत येथे आमच्यासोबत काम करणारे अनेक जण आहेत. मात्र देशाच्या राजधानीमध्ये पक्षाची जी स्थिती असायला हवी, त्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही अनेक लोकांसोबत चर्चा करत होतो आणि मला आनंद आहे की दिल्ली विधानसभेचं अध्यक्षपद ज्यांनी सक्षमपणे सांभाळले, एक चांगला अध्यक्ष विधानसभेचे कामकाज कसे चालवू शकतो याचा आदर्श शास्त्रीजींनी देशासमोर घातल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून आमची शास्त्रीजींशी चर्चा सुरू होती की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या संघटनाची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घ्यावी. मला आनंद आहे की आमच्या विनंतीचा स्वीकार त्यांनी केला. फक्त त्यांनीच नव्हे तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनीही राष्ट्रवादीमध्ये काम करण्याची तयारी दाखवली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या सर्वांचे स्वागत करतो”असेही शरद पवार म्हणाले.
सामान्यांना भाजपाला पर्याय हवा आहे, असे सांगत राष्ट्रवादी त्या मार्गाने प्रयत्न करत असल्याचेही पवारांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “देशातल्या काही राज्यांत येत्या काही दिवसांत निवडणुका आहेत. त्यामुळे आमची जबाबदारी आहे की सामान्य जनतेला सांप्रदायिक शक्तीला बाजूला सारण्यासाठी जो पर्याय उभा करण्याची आवश्यकता आहे, ज्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे. तो प्लॅटफॉर्म मिळवून देण्याच्या दिशेने आम्ही तयारी करत आहोत.
आज त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण आम्ही याच दिशेने प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला यश नक्की मिळेल कारण देशवासियांना भाजपाच्या हुकुमशाहीमुळे पुढे येणाऱ्या सांप्रदायिक शक्तींमुळे देशातली शांतता भंग होत आहे. त्यामुळे लोकांना आता पर्याय हवा आहे. आणि तो देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत. यासाठी आधी आम्हाला आमचा पाया मजबूत करायला हवा. मला आनंद आहे की शास्त्रीजीने दिल्लीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची तयारी दाखवली” असेही शरद पवार म्हणाले.

from Parner Darshan https://ift.tt/3qL7Q4D

Leave a Comment

error: Content is protected !!