
आपल्यातलं अज्ञान आपल्याला देवापर्यंत जाऊ देत नाही. शिवाय ज्यामार्गे आपण देवाला भजतो आहोत त्यातुन त्याची प्राप्ती अशक्यच आहे. देव दर्शनाखेरीज तो मानावाच कसा?देवदर्शन न होता देवदेव करणं म्हणजे बाभळीच्या झाडाला आंबे लागण्याची वाट पहाण्यासारखे आहे.देव पहाता येतो का?
होय खात्रीशीर देव पहाता येतो.पण यथायोग्य मार्ग मिळाला तर.कुणाला जर असं वाटत असेल की भारतीय परंपरेत योगविद्येचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.योगसाधनेने,यज्ञयाग करुन देवाची प्राप्ती होऊ शकते.त्याला अष्टांग योगसाधना म्हणतात.पण हे अत्यंत कष्टप्रद आहे.यासाठी लागणारे कायिक, मानसिक आणि वाचिक तप घडणे महाकठीण आहे.
तितकी शुद्ध कर्मं घडणं सुईच्या अग्रावर चालण्यासारखं आहे.त्यामुळे देव तर भेटणार नाहीच पण त्यासाठी केलेली साधनांची जमवाजमव आणि त्यातुन निर्माण झालेला दंभ,उपाधी विकारांकडे घेऊन गेल्याशिवाय रहाणार नाही.
माऊली हरिपाठात म्हणतात, योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥
कोणत्याही वस्तू अथवा प्रसंगाशी भाव निर्मिती हाच मुख्य आधार आहे. देव पहाण्यासाठी श्रुतिवचनावर भाव,श्रद्धा असली पाहिजे. मंत्र, गुरु,देव,डॉक्टर यांच्यावर श्रद्धा असल्याखेरीज प्रचिती येत नाही.सिद्धीस पावण्यासाठी भाव हाच प्रधान आहे. इथं भाव हा शब्द व्यापक अर्थाने नामावरील श्रद्धेशी संबंधित आहे.गुरुने दिलेले नाम नामधारकाला सिद्धते पर्यंत घेऊन जाण्यास पर्याप्त आहे. कसे? ते पुढील भागात पाहु.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3H7pCnx