दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई का येते? 

Table of Contents

अनेकदा दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई येते. मात्र असं का होतं? याचा शोध वैज्ञानिकांनी लावला आहे. आज या कारणाबाबत जाणून घेऊयात… 
आपल्या जांभईचा संबंध थेट मेंदूशी आहे. खरंतर जांभई आपल्या मेंदूचे तापमान नियंत्रित करण्यासाठी होत असलेली प्रक्रिया आहे. जेव्हा वातावरणातील तापमान कमी होते, तेव्हा शरीराचे तापमान वाढते, आणि वातावरणातील तापमान वाढल्यावर शरीराचे तापमान कमी होते. अशा वेळी मेंदू शरीरातील अधिक ऑक्सिजन वापरून आपले तापमान नियंत्रित ठेवत असतो.
संशोधकांना असे देखील समजले आहे की उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात लोक अधिक प्रमाणात जांभई देतात. जगभरातील 50 टक्के लोक समोरच्या व्यक्तीला जांभई देताना पाहून जांभई देतात. काहींना तर टीव्ही स्क्रीनवर जरी कोणाला जांभई देताना पाहिलं, तरी जांभई येते.
यासाठी मेंदूमधील मिरर न्यूरॉन सिस्टीम कारणीभूत असल्याचं संशोधकांना समजलं आहे. मिरर न्यूरॉन सिस्टीम ही आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची नक्कल करण्यासाठी प्रवृत्त करत असते. यामुळेच टीव्ही स्क्रीनवर असो किंवा फोनवरही एखाद्याला जांभई देताना पाहिलं की आपणही जांभई देतो.

from https://ift.tt/3pRUxyD

Leave a Comment

error: Content is protected !!