पारनेर : तालुक्यातील ख्रिस्ती बांधवांच्या प्रार्थनास्थळासाठी आमदार निलेश लंके यांनी स्वतःच्या मानधनातून विविध वस्तूंची भेट देत ख्रिस्ती बांधवांना दिलेल्या शब्दाची पुर्तता केली. यावेळी निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या वतीने प्रत्येकी सुमारे दोन हजार रूपये किंमतीच्या २७ किराणा किटचेही वितरण करण्यात आले. 
काही दिवसांपूर्वी ख्रिस्ती बांधवांच्या प्रार्थनास्थळामध्ये चोरी होऊन तेथील विविध वस्तू लांबविण्यात आल्या होत्या. आ. नीलेश लंके यांनी प्रार्थनास्थळी भेट देत ख्रिस्ती बांधवांना दिलासा दिला. चोरीस गेलेल्या वस्तू मी माझ्या मानधनातून खरेदी करून देतो असा शब्द त्यांनी दिला होता. या शब्दाची पुर्तता करीत आ. लंके यांनी या प्रार्थनास्थळासाठी १ साउंड सिस्टम मशिन, २ साउंड, २ माईक, २ माईक स्टॅण्ड, साउंड सिस्टीम वायर भेट देण्यात आले. यावेळी २७ ख्रिस्ती बांधवांसाठी नीलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या वतीने किराणा किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, मतदारसंघातील नागरीकांना मला विधानसभेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठविल्यानंतर संकट काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी माझी आहे. ख्रिस्ती बांधवांचे साहित्य चोरी झाल्यानंतर त्यांना ते मी खरेदी करून दिले हे माझे कर्तव्यच आहे. कर्तव्यभावनेतून मदत करणे हेच लोकप्रतिनिधीचे काम असते ते मी करीत आहे. कोरोनाचे संकट पुन्हा वाढू लागले असून नागरीकांनी त्यापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आ. लंके यांनी यावेळी केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर, अ‍ॅड. राहूल झावरे, डॉ. बाळासाहेब कावरे, कारभारी पोटघन, बापूसाहेब शिर्के, जितेश सरडे, सतिश भालेकर, श्रीकांत चौरे, निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा सविता ढवळे यावेळी उपस्थित होत्या.

from https://ift.tt/3sWmrew

By News

Leave a Reply

Your email address will not be published.