मी नुकताच प्रवचनसेवेहुन आश्रमात परतलो होतो.सकाळचे साडेनऊ वाजले होते.मला आल्यावर समजले की सकाळी सात वाजल्यापासून एक व्यक्ती तुमची वाट पहात आहे. मग मी त्यांची भेट घेतली. डोक्याचे केस पुर्ण पांढरे झालेले,कपाळावर बुक्का,गळ्यात तुळशीमाळ,फिक्कट निळसर सफारी घातलेली,चार बोटांमधे सोन्याच्या आंगठ्या,पायात पॉलिश केलेले काळे बुट.एकंदरीत सत्तरीच्या आसपास वय असावं.काही तरी वेगळं काम घेऊन आले असावेत असा मी अंदाज केला.
बाबा कुठुन आलात?काय काम काढलंत?बाबा म्हणाले,”माझं नाव ×××आहे. मी ××××या गावचा आहे.मला आश्रमात रहायचं आहे.”बाबा तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही निराधार वाटत नाही.तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा बरं मला.मग बाबांनी कौटुंबिक समस्या सांगायला सुरुवात केली.
“माझी आर्थिक स्थिती चांगली आहे.मला एकच मुलगा आहे.तो स्वतः एक कंपनी चालवत आहे.त्याचं लग्न झालं आहे,त्याची बायकोही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मला एक नातुही आहे,पाच वर्षांचा.पण सुनबाईचं आणि माझं अजिबात जमत नाही.तिनच मला घराबाहेर काढलं आहे.एक महिन्यापासून मी असाच फिरत आहे.”

मी त्यांना मुलाचा मोबाईल नंबर मागितला,पहिल्यांदा ते देतच नव्हते.पण बरीच विनंती केल्यानंतर दिला.मग मी फोन लावला.त्यांचा मुलगा म्हणाला,”साहेब आपण जीथे असाल तिथून गाडी करुन या मी भाडे देईल. आम्ही भरपूर शोधाशोध केली,पोलिस केसही दिली आहे.” मला मुलगा अत्यंत सकारात्मक आणि सज्जन वाटला.
मग बाबांना घेऊन आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. नातवाने आजोबांना पाहिल्यावर त्याने जवळजवळ अंगावर उडीच मारली.मोठमोठ्याने रडु लागला.मुलाचेही डोळे पानावले सुनबाई मात्र जमिनीकडे पाहुन अश्रु ढाळीत होत्या.मी निरिक्षण करत होतो.हे वाचताना तुम्हीही अंदाज बांधला असेल!आज पहिल्यांदा मी अंदाज बांधण्यात चुकलो होतो.सत्य काय होतं?पाहु उद्याच्या भागात.स्वतःला आणि दुसऱ्याला आनंद देतं तेच खरं अध्यात्म.
रामकृष्णहरी

from Parner Darshan https://ift.tt/2YMKn7v

By News

Leave a Reply

Your email address will not be published.