वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. यानिमित्ताने खरेदी, फराळ आणि फटाके यांची एक वेगळीच रेलचेल असते. आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजवताना काय काळजी घ्यायला हवी? याबाबत माहिती पाहूयात..      
● फटाके उडवायला जाताना लांब ओढणीचे, नायलॉनचे, सिल्कच्या झब्ब्यासारखे कपडे घालणं टाळा. शक्यतो सुती कपडे घालण्याचा प्रयत्न करा.
● नेहमी माेठ्या व्यक्तींच्या देखरेखीखाली आणि घरापासून दूर माेकळ्या जागेत फटाके उडवा.
● फटाके उडवताना जवळच पाण्याची किंवा वाळूची बादली भरून ठेवा. संकटकाळी यामुळे मदत होऊ शकते.
● फटाके उडवताना तुमच्या आजूबाजूला कोणी प्राणी नाही आहे कि नाही? याची खात्री करा. कारण मुके प्राणी अशा फटाक्यांना घाबरतात.
● रॉकेटसारखे उंच उडणारे फटाके इमारतीच्या गच्चीत किंवा मैदानात अथवा मोकळ्या जागीच लावा. अन्यथा त्यामुळे नुकसान होऊ शकते.
‘या’ गोष्टी करा :
● फटके उडवताना हात ताठ सरळ ठेवा. यामुळे फटाका आणि तुमच्यातलं अंतर वाढेल.
● आग लागल्यासारखा अपघात झालाच तर प्रथम ती आग विझवा, जळालेले कपडे काढा. जखमीला ब्लॅंकेट किंवा बेडशीटमध्ये लपेटा.
● फटाके फोडायला जाताना चपला घालूनच जा आणि आल्यावर हात स्वच्छ साबणाने धुवा.
‘या’ गोष्टी टाळा :
● फुलबाजा किंवा अन्य कोणताही फटाका जळत-जळत घरापर्यंत आणू नका.
● काहीही झाले तरी खिशात फटाके बाळगू नका.
● अर्धवट जळालेल्या फटाक्यांपासून नवीन फटाके तयार करण्याचे नसते धाडस टाळा.
मोठ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना! : दिवाळीच्या काळात तेलाचे दिवे मुलांचे हात पाेहोचू नये अशा ठिकाणी ठेवा. झाेपायच्या अगोदर दिवे विझवण्याचे लक्षात ठेवा. नेहमी मेणबत्ती स्टँडचा वापर करा.
वरील गोष्टी व्यवस्थित केल्यावर तुमची दिवाळी नक्कीच आनंदात जाईल.

from Parner Darshan https://ift.tt/3CN5N31

By News

Leave a Reply

Your email address will not be published.