✒ दीपक करंजुले
वाडेगव्हाण: थंडीची सुरुवात आणि त्यात अचानक बेमोसमी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व मेंढापाळांचे मोठे नुकसान होत आहे. गुरुवारी या वातावरणाचा मुक्या जनावरांना देखील फटका बसला असून पारनेर तालुक्यातील कळमकरवाडीतील ३० मेंढ्या या अवकाळी पावसाने व वातावरणात झालेल्या गारव्यामुळे गारठून मृत्यूमुखी पडली आहेत. नुकसान झालेल्या मेंढपाळास आर्थिक मदत त्वरीत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी केली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मेंढपाळ रमेश नामदेव ठोंबरे (रा.अरणगाव ता. शिरूर) हे आपल्या १८० मेंढ्या घेऊन कळमकरवाडी या ठिकाणी सह परिवारासह मुक्कामास होते. गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसाच्या थंडीत गारठून ३० मेंढ्या मुत्युमुखी पडल्या. या संदर्भात आमदार निलेश लंके यांनी पंचनामा करून शवविच्छेदन करण्याच्या सूचना पारनेर प्रशासनास दिल्या होत्या.
त्या नुसार मुत्युमुखी पडलेले मेढ्याचा पंचनामा तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी,सरपंच विक्रमसिंह कळमकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले असून पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत तालुक्यात ५५४ पेक्षा अधिक मेंढ्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून अजूनही पंचनामे सुरू असल्याची माहिती पारनेर प्रशासनाकडून मिळाली आहे.
या पूर्वी कोरोनाने हैराण झालेल्या बळीराजाला पुन्हा एकदा निसर्गाने फटका दिल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. कळमकरवाडीत बुधवारी रात्री झालेल्या पावसाच्या थंडीत गारठून ३० मेंढ्या मुत्युमुखी पडल्या. मुत्युमुखी पडलेले मेंढ्याचा पंचनामा झाला असला तरी मेंढपाळाला आधार देण्यासाठी शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी आमदार निलेश लंके व जिल्हा प्रशासनाकडे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष तथा पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर यांनी केली आहे.

from https://ift.tt/2ZU2U2q

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *