भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजे काय? यामुळे कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळते? किती पगार मिळतो? कोणते शिक्षण घ्यावे लागते? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये तुम्हाला नक्की मिळतील..

भारतीय परराष्ट्र सेवा अर्थात IFS (Indian Foreign Service). ही भारतीय परराष्ट्र मंत्रालय चालवण्यासाठी एक विशेष सेवा आहे. यामाध्यमातून भारताबाहेरील कामकाजाचे व्यवस्थापन केले जाते. हाअधिकारी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. तसेच भारतासोबत इतर देशांचे सांस्कृतिक संबंध वाढवण्याची जबाबदारी त्यावर असते.
या पदावर कार्यरत असताना तुम्हाला परदेशात राहण्याची संधी मिळते. हे अत्यंत सन्माननीय पद मानले जाते. यामध्ये चांगल्या पगारासोबत अनेक सुविधा मिळतात. परदेशी आणि भारतात राहणाऱ्या अनिवासींना कॉन्सुलर सुविधा पुरविण्याचे कामही या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे.

IFS अधिकारी होण्यासाठी कशी निवड होते? : यासाठी नागरी सेवा परीक्षा UPSC द्वारे द्यावी लागते. त्यात उत्तीर्ण झालेल्यानाच IAS, IPS आणि IFS स्तरावरील नोकऱ्या मिळू शकतात. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आणि तुमच्या पसंतीच्या आधारावरच तुम्हाला सेवेत निवडले जाते.
पात्रता काय? : यासाठी कोणत्याही शाखेतून (कला, वाणिज्य आणि विज्ञान) 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षात असाल तरी पूर्व परीक्षा देऊ शकता. या परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे.

पगार किती? : सुरुवातीला 60 हजार ते 2.5 लाख रुपये पगार मिळतो. वेतन श्रेणी आणि रँकनुसार ठरवले जाते. तर परदेशात तैनात अधिकाऱ्यांचे पगार जास्त आहेत.

from https://ift.tt/DYdtys7

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *