
हल्ली ‘आधार’ हा सर्वात महत्त्वाचा ओळखीचा पुरावा बनला आहे. सर्व सरकारी योजना किंवा अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, फसवणुक करून तुमचे आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊ शकते. जर तुम्हाला याबाबत काही शंका असले तर खालील सोप्या पद्धतीने तुम्ही याववत जाणून घेऊ शकता…
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ही सुविधा पुरवते जेणेकरून तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे? हे तपासता येईल.
आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री कशी तपासायची? :
● सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in वर जा.
● आता Aadhar Authentication History वर क्लिक करा.
● यानंतर तुमचा आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड टाका.
● आता ‘Generate OTP’ वर क्लिक करा
● यानंतर माहितीचा कालावधी आणि ट्रान्सझॅक्शनची संख्या नमूद करा.
● आता निवडलेल्या कालावधीसाठी ऑथेंटिकेशन रिक्वेटचे डिटेल्स स्क्रीनवर दिसतील.
गैरवापर झाल्यास अशी तक्रार करा : जर तुम्हाला तुमच्या आधारच्या वापरात गैरवापर झाल्याची शंका अली तर किंवा काही अनियमितता आढळल्यास, ताबडतोब UIDAI टोल फ्री क्रमांक – 1947 वर किंवा help@uidai.gov.in येथे ईमेलद्वारे संपर्क साधा.
from Parner Darshan https://ift.tt/3HfBAN0